वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्रात कोरोनासोबतच आता ओमायक्रॉनचा कहरही वाढला आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दररोज 40 हजारांच्या पुढे जात आहे. तर ओमायक्रॉननंही सलग दुसऱ्या दिवशी 100 हून अधिक रुग्णांची नोंद केली आहे. शनिवारी राज्यात ओमायक्रॉनचे 125 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 7 हजार 743 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 1 हजार 730 वर गेली आहे. म्हणजेच ओमायक्रॉनचा देशातील प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातील आहे. यावरून महाराष्ट्रातील ओमायक्रॉन अपडेटशी संबंधित परिस्थिती समजू शकते.
राज्यात एका दिवसात 879 लोक मधून बरे झाले आहेत. कोरोनाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 71 हजार 202 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या महाराष्ट्रात एका दिवसात 42 हजार 462 रुग्ण आढळले आहेत. तसेच 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
No comments:
Post a Comment