वेध माझा ऑनलाइन - समाज जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबवणारे नगरसेवक सुहास जगताप यांनी कोरोना महामारी बाबत जनजागृती व्हावी, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी यासाठी मकर संक्रातीचे निमित्त साधून घरोघरी जाऊन मास्क चे वाटप केले .त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
नुकतीच मकर संक्रात होऊन गेली यानिमित्ताने सर्वत्र तिळगुळ दिले जाते .मात्र सुहास जगताप यांनी कोरोना बाबत जनजागृती व्हावी, नागरिकांनी आपली काळजी घ्यावी, मास्क वापरावेत यासाठी आकर्षक डबीतून तिळगुळसह दोन हजार मास्क चे घरोघरी जाऊन वाटप केले.
सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या जगताप यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या स्व:खर्चातून सोमवार पेठेतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जुन्या काळातील रांजणाचा आकार देवून सोमवार पेठेत पाणपोई बसवण्यात आली आहे. जगताप यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम केले असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्व:खर्चाने शहरात आवश्यकतेनुसार सॅनिटाईज फवारणी केली आहे. नागरिकांना दूध, भाजीपाला घरोघरी वाटप केले आहे. तसेच सोमवार पेठेत मोठ्या बिल्डिंगमध्ये महत्वाचे फोन नंबरचे फलक लावले आहेत.
No comments:
Post a Comment