Sunday, March 22, 2026

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले...अपयश झाकण्यासाठी पालकमंत्री खोटे आरोप करत आहेत ;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया लोकशाही पद्धतीनेच पार पडली आहे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम अजिबात या प्रक्रियेत झालेले नाही आपले अपयश झाकण्यासाठी आमचे विरोधक आमच्यावर खोटे आरोप करत आहेत असे स्पष्टीकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री ना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे विरोधक जिंकले तर ती लोकशाही आणि आम्ही जिंकलो तर ती दांडगाई हा कुठला न्याय असा सवाल ही त्यांनी यावेळी केला
यावेळी मंत्री जयकुमार गोरे कराडचे आमदार मनोज घोरपडे डॉ अतुल भोसले विक्रम पावसकर तसेच भाजपचे साताऱ्याचे विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते 

ना भोसले म्हणाले आम्ही लोकशाही पद्धतीनेच ही निवडणूक लढलो आहे आम्ही भाजप चे मंत्री कोणीही त्या ठिकाणी आवारात आमचे वाहन घेऊन गेलो नाही फक्त निवडीनंतर अभिनंदन करायला आम्ही दोघे मंत्री त्याठिकाणी गेलो
आमच्या सदस्यांनी मतदान केले त्यानंतर सेने-राष्ट्रवादी चा लोकांनी आम्हाला मतदान केले ते त्यांना न करता आम्हाला का केले? याचा अर्थ त्या सदस्यांवर दबाव होता असाच त्याचा अर्थ होतो, आणि शंभूराजे देसाई आपले अपयश लपवण्यासाठी आमच्यावर खोटे आरोप करत आहेत असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आहेत

No comments:

Post a Comment