Friday, March 20, 2026

जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार ; झटापटीत मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हाताला लागलं!

वेध माझा  ऑनलाइन
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅनही आखण्यात आले होता. 

या सगळ्या घडामोडींमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवलं. सभागृहात घेऊन जाताना झालेल्या झटापटीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला देखील लागले. मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले. त्यामुळे सिनेस्टाईल थरार जिल्हा परिषदच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत पाहायला मिळाला. 
कामेस कांबळे, अनिल देसाई यांच्यासह काही सदस्यांना टार्गेट केल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मात्र आपली संपूर्ण ताकद लावून सर्व सदस्यांना सुखरूप सभागृहात पोहोचवलं. त्यामुळे भाजपाचा डाव फसल्याचं चित्र त्यावेळीतरी स्पष्ट दिसून आले. 



No comments:

Post a Comment