जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर येथील प्रीतिसंगमावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी नूतन पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले आहे. यशवंत विचारांचा गळा घोटून त्यांच्याच समाधीचे दर्शन घेण्याचा दिखावा भाजपकडून केला जात आहे असा आरोप करत स्मृतिस्थळ पवित्र करण्यासाठी लवकरच गोमूत्र शिंपडण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे नगरसेवक विजयसिंह यादव यांनी सांगितले.
दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सर्वपक्षीय आक्रमक झाले. निवड प्रक्रिया रद्द करून ती नव्याने घेण्याची जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रीय काँग्रेस, तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दत्त चौकात एकत्र येत निषेध आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात नगरसेवक विजयसिंह यादव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, सचिन पाटील, मोहन कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, अखिल भरतील मराठा संघाचे अनिलबापू घराळ, रुपेश मुळे, वैशाली रोहन विभुते आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment