Saturday, March 28, 2026

कराडच्या रेव्हेन्यू कॉलनीमधील विठ्ठलराव देशमुख परिवाराच्या वतीने आमदार अतुलबाबांचा वाढदिवस साजरा - अभयकुमार देशमुख व विक्रम देशमुख यांच्या वतीने अतुलबाबांना अनोख्या उपक्रमाने शुभेच्छा ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन।
कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराडच्या रेव्हेन्यू कॉलनीमध्ये विठ्ठलराव देशमुख परिवाराच्या वतीने आज अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस आणि खाऊचे वाटप करण्यात आले.

दरम्यान आमदार अतुल भोसले यांचे समाजकार्य उत्तुंग असल्याचे सांगत त्यांची पुढील वाटचाल देखील आभाळाला गवसणी घालणारी असावी व त्याद्वारे कराडच्या लौकिकात उत्तरोउत्तर भर पडावी अशा भाषेत देशमुख कुटुंबियांच्या वतीने अभय देशमुख व विक्रम देशमुख बंधूनी देशमुख कुटुंबाच्या वतीने अतुलबाबांना शुभेच्छा दिल्या 

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे डॉ. अतुल भोसले यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाचा आदर राखत कार्यकर्त्यांनी वाढदिवस साध्या आणि सामाजिक उपक्रमातून साजरा केला.

दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रभाग क्रमांक तीन मधील 112 नंबरच्या अंगणवाडीतील तीस विद्यार्थ्यांना यावेळी गणवेश वाटप करण्यात आले. 
या कार्यक्रमाला कराड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, मलकापूर नगरपरिषदेचे नियोजन सभापती सुरज शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रताप माने यांची उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना विजय वाटेगावकर आणि सुरज शेवाळे यांनी देशमुख परिवाराने आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक करत आमदार डॉक्टर अतुल भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाला विठ्ठलराव देशमुख, वंदना देशमुख, विक्रमसिंह देशमुख,अभयकुमार देशमुख, सारिका देशमुख, मिनल शिंदे, अंगणवाडी शिक्षिका वंदना पाटसुपे, कोमल लगाडे, पत्रकार अमोल टकले, सागर दंडवते, सुहास कांबळे, अनिल लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार व लेखक अभयकुमार देशमुख यांनी केले.

No comments:

Post a Comment