Friday, March 27, 2026

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले...जिल्ह्यात गॅसचा तसेच पेट्रोल डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध...

वेध माझा ऑनलाइन।
जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ग्राहकांना मुदतीत गॅस मिळेल लोकांना पॅनिक होऊन गॅस एजन्सीसमोर नाहक रांगा लावू नयेत तसेच पेट्रोल डिझेलचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, व इंडियन ऑइल या कंपन्यांनी जिल्ह्यातील वितरकांना एक दिवसाचे क्रेडीट देऊन पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही टंचाई नाही, याबाबत लोकांनी आश्वस्त रहावे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील अशी ग्वाही पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.

जिल्ह्यातील पेट्रोल, एलपीजी तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्या संदभार्त पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, अपर जिल्हाधिकारी मल्लीकार्जून माने, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह पुरवठाधारक कंपन्यांचे प्रतिनिधी, सर्व प्रांताधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment