Tuesday, March 17, 2026

शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला ; कुठे घडली घटना ? काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाईन
शिर्डीतील लोणी गावात संतापजनक घटना घडली असून शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं अहिल्यानगर जिल्हा हादरला असून थेट विधिमंडळात याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. शिर्डीतील घटना अत्यंत निंदानजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही, असा सवाल आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. तर, मंत्री आदिती तटकरे, आमदार मनिषा कायंदे यांनीही या घटनेवरुन तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला सोडलं जाणार नाही, असे सांगितले. आता, अहिल्यानगरचे पालकमंत्री तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेवर प्रतिक्रिया दिलीय. 
 
शिर्डीतील अॅसिड हल्ला प्ररकणाची मी माहिती घेतली आहे, 13 वर्षाची मुलगी आहे, रस्त्यावर थांबून त्या मुलाने तिच्यावर अॅसिड फेकलं. खरंतर ग्रामीण भाग आहे, त्याच्यामुळे तिथे जवळपास सीसीटीव्ही नाहीत. पण हा मुलगा गावातलाच असू शकतो, त्यामुळे पोलिसांचा तपास जलद गतीने सुरू आहे. पोलीस कसून तपास करत आहेत, आजच आरोपी पकडला जाईल, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले. तसेच, अशा घटनांमध्ये जे आरोपी असतात त्यांना कठोरातील कठोर शिक्षा आणि कारवाई व्हायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.

No comments:

Post a Comment