राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना, कराड दक्षिणमधील विकासकामांना मोठया प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील ३३ कोटी ६७ लाख रुपयांच्या विकासकामांना अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणण्यासाठी आ.डॉ. अतुलबाबा भोसले सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात कराड दक्षिणमधील रस्ते सुधारणा व पुलांच्या बांधकामांसाठी भरघोस निधी मिळावा, यासाठी आ.डॉ. भोसले यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातात्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत ना. फडणवीस यांनी नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध विकासकामांसाठी ३३ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे.
यामध्ये कराड दक्षिणमधील रा. म. ४ ते कोयना वसाहत - जखिणवाडी – नांदलापूर - पाचवड फाटा - मुनावळे - कालेटेक - नारायणवाडी - आटके जाधव मळा - ठोंबरे मळा - रेठरे बु. रस्ता प्रजिमा-८० कि.मी. १६/९०० ते १९/४०० (भाग - जाधव मळा ते रा. मा. १४८) रस्त्याची नवीन रिटेनिंग वॉल बांधण्यासह रस्ता सुधारणा करणे (३ कोटी), रा. म. ४ ते कोयना वसाहत - जखिणवाडी - नांदलापूर - पाचवड फाटा - मुनावळे - कालेटेक - नारायणवाडी - आटके जाधव मळा - ठोंबरे मळा - रेठरे बु. रस्ता प्रजिमा-८० कि.मी. ०/०० ते ४/५०० (भाग कोयना वसाहत ते नांदलापूर)ची सुधारणा करणे (३ कोटी), राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पाचवडेश्वर - कोडोली - दुशेरे - शेणोली स्टेशन रस्ता प्रजिमा ६५ किमी ७/०० ते १२/०० ची सुधारणा करणे (१ कोटी), येणके - आणे - कोळे - कोळेवाडी ते पुनर्वसित घारेवाडी प्रजिमा-७६ कि.मी. १०/५०० ते १३/३०० (कोळेवाडी ते बामणवाडी)ची सुधारणा करणे (२ कोटी), आटके टप्पा ते आटके जाधव मळा - रेठरे बु. व्हाया डंगारे वस्ती – पवार मळा - खुबी रस्ता प्रजिमा- ७७ कि.मी. ६/०० ते ८/००० व १८/७०० ते १९/३०० रस्त्याची सुधारणा करणे (१.५० कोटी), कालेटेक - काले - संजयनगर - कालवडे - नांदगाव - साळशिरंबे - पाचुंब्री रस्ता प्रजिमा-७३ कि.मी. ०/०० ते ४/५०० (भाग कालेटेक ते कालवडे) रस्ता सुधारणा करणे (३ कोटी), वाखाण वस्ती कराड - ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-५५ कि.मी. १४/०० ते १७/०० (भाग - विंग ते घारेवाडी)मध्ये रस्त्याची सुधारणा व दुतर्फा बंदिस्त गटर बांधकाम करणे (१.५० कोटी), वाखाण वस्ती कराड ते ढेबेवाडी रस्ता प्रजिमा-५५ कि.मी. ७/२०० ते ८/०० (भाग बैलबाजार रस्ता (रा. मा. १४४) ते ढेबेवाडी फाटा)मध्ये काँक्रीट रस्त्याचे चौपदरीकरण बांधकाम करणे (१० कोटी), नांदगाव दक्षिण मांड नदीवर कि.मी. १/४०० मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करणे (६.७३ कोटी), कराड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयीन इमारतीचे बांधकाम करणे (१.९३ कोटी) अशा एकूण ३३ कोटी ६७ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कराड दक्षिणमधील या महत्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. तसेच याबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत.
No comments:
Post a Comment