आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगमावर श्रद्धेचा अनोखा संगमअनुभवायला मिळाला.उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी समाधीसमोर नतमस्तक होऊन पुष्पचक्र अर्पण केले, काही क्षण शांत उभ्या राहून महान नेत्याच्या स्मृतींना विनम्र वंदन केले आणि त्यांच्या आदर्शांच्या मार्गावर चालण्याचे संकल्प व्यक्त केला.
यावेळी प्रीतीसंगम परिसरात सकाळपासूनच श्रद्धा, आदर आणि भावनांनी भारलेले वातावरण निर्माण झाले होते.उपस्थितांनी , यावेळी आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवर एकत्र येऊन भावपूर्ण अभिवादन करताना दिसले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, नागरिक तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य महाराष्ट्रासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या समाधीस्थळी येताच मनात ऊर्जा, धैर्य आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यांच्या आदर्शांवर चालत राज्याच्या विकासासाठी कार्य करणे हीच खरी आदरांजली ठरेल.”
No comments:
Post a Comment