वेध माझा ऑनलाइन।
मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिका आणि इस्त्रायलचे इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनेई हे देखील जखमी झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि 28 फेब्रुवारी रोजी मध्य पूर्वेत एका भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात अमेरिकेनं देखील उडी घेतली. अमेरिकेनं त्यापूर्वीच युद्धाची तयारी पूर्ण केली होती. दरम्यान युद्धाच्या दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर इराण जेवढ्यावेळेस नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करेल तेवढ्यावेळेस आम्ही त्याला मारू अशी धमकी इस्त्रायलकडून इराणला देण्यात आली होती. मात्र इराणने पुन्हा एकदा आपल्या नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली. आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोजतबा खामेनेई हे देखील अमेरिका आणि इराणच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असल्याची बातमी समोर आली होती. त्यावर आता अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी मोठा दावा केला आहे, इरानचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनेई हे युद्धात जखमी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांचा चेहरादेखील पूर्णपणे खराब झाल्याची शक्यता आहे, असं हेगसेथ यांनी म्हटलं आहे. मोजतबा खामेनेई सध्या अशा अवस्थेमध्ये आहेत की ते आता त्यांच्या देशाचं नेतृत्व देखील करू शकणार नाहीत, इराणचं नेतृत्व भित्र आहे. लपून बसलं आहे. युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी झालेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा आणि त्यांच्या काही नातेवाईकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा एकही फोटो किंवा व्हिडीओ समोर आला नसल्याचे पीट हेगसेथ यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment