Sunday, March 15, 2026

सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ;

वेध माझा ऑनलाईन।
मध्य महाराष्ट्रात  हवामानाचा वेगळाच चित्र दिसण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सातारा सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे  आणि अहिल्यानगर परिसरात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. याच कारणामुळे या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात  मात्र सध्या उन्हाची तीव्रता कायम आहे. नाशिक धुळे  नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये तापमान 37 ते 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवू शकतो. मात्र 15 मार्चपासून या भागात हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून वातावरणात काही प्रमाणात बदल होऊ शकतो.
मराठवाडा भागातही उष्णतेचा प्रभाव कमी होत असताना काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. बीड आणि धाराशिव येथे वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडू शकतो, तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागांमध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागातील तापमान 36 ते 39 अंश सेल्सियसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.


No comments:

Post a Comment