वेध माझा ऑनलाइन।
मध्यपूर्वेतील तणाव आणि इंधन पुरवठ्याच्या चर्चांदरम्यान देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत या अफवांना फेटाळून लावत कठोर इशारा दिला आहे. लॉकडाऊनची कोणतीही परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले असून खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment