Sunday, March 22, 2026

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले...सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी प्रशासन,पोलीस घरगड्यासारखे वागले...लोकशाहीचा गळा घोटाळा गेला...

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी प्रशासन भाजपच्या बाजूने घरगडी असल्यासारखे वागले मी आणि मकरंद आबा असे आम्ही दोन मंत्री जिल्ह्यात असताना आम्हाला 10, 10 पोलिस मागे ओढत होते आमचे सदस्य संख्या सर्वाधिक होती लोकांनी आम्हाला कौल दिला असताना लोकशाहीचा गळा घोटून भाजपने सत्ता स्थापन केली जरी हे क्षणिक सुख भाजपला झाले असले तरी यापुढे सातारा जिल्ह्यात याचे पडसाद नक्कीच उमटणार आहेत असा इशारा देत झालेल्या एकूणच या घटनेबाबत ना शंभराज देसाई यांनी जाहीर निषेध केला तसेच जे या निवडीवेळी  सभासद फुटले त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचेही ते म्हणाले खोट्या केसेस टाकून या निवडणुकीसाठी प्रशासनाने लोकशाहीचा खून केला असा आरोपही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे

No comments:

Post a Comment