वेध माझा ऑनलाइन।
देशभरात जाणवणाऱ्या एलपीजी टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गॅस वितरणाबाबत अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर ताण आल्याने, गॅसचा साठा वाचवण्यासाठी आणि तो गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. ज्यानुसार ठरावीक लोकांना गॅस सिलिंडर घेता येणार नाही.
या नवीन निर्णयानुसार, आता विशिष्ट ग्राहकांना नवीन सिलिंडर मिळणार नाहीत आणि रिफिलिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.
कोणाला मिळणार नाही एलपीजी सिलिंडर?
नवीन नियमांनुसार, ज्या कुटुंबांकडे आधीच पाईपद्वारे नैसर्गिक वायू कनेक्शन आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी सिलिंडर मिळणार नाहीत. सरकारने या संदर्भात स्पष्ट अटी घातल्या आहेत:
पीएनजी ग्राहकांना त्यांच्याकडील विद्यमान एलपीजी सिलिंडर आता पुन्हा भरून घेता येणार नाहीत.
ज्यांच्याकडे पीएनजी सुविधा उपलब्ध आहे, असे नागरिक आता नवीन एलपीजी कनेक्शनसाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.
No comments:
Post a Comment