Wednesday, March 25, 2026

डंपर खाली सापडून एका दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू ; कराड शहरातील विजय दिवस चौक ते कृष्णा नाका दरम्यानच्या रोडवर घडली घटना ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड शहरातील विजय दिवस चौक ते कृष्णा नाका दरम्यानच्या रोडवर जनता बँकेसमोर बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान डंपर खाली सापडून एका दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुषमा कीर्तने रा. हजारमाची ता. कराड असे या महिलेचे नाव असून ही महिला जनता बँकेसमोर रस्ता ओलांडत असताना ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले.

सदर महिला विद्यानगर परिसरातील एका महाविद्यालयात कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान विजय दिवस चौक ते कृष्णा नाका दरम्यान मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या पोट रस्त्यावर अनेक अडथळे, हातगाडे, झाडी असल्याने मुख्य रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही याशिवाय ही वाहने वेगाने असतात. विशेष करून दुचाकी वाहनांना या मुख्य रस्त्यावरील वाहनांचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेक वेळेला या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान घटनास्थळी वाहतूक विभागाचे माळी व चव्हाण तात्काळ दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment