वेध माझा ऑनलाइन।
राज्यात अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.
याप्रकरणी बोलताना चाकणकर म्हणाल्या, "खरात प्रकरणी आपण आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात आपला दुरान्वयेही संबंध नाही. पोलीस तपासात या गोष्टी समोर येतीलच. हा तपास पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे, असं रुपाली चाकणकरांनी म्हटलं आहे. खरात प्रकरणाबाबत कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत,ते वेदनादायक आहे."
No comments:
Post a Comment