Saturday, March 28, 2026

आमदार अतुल भोसलेंच्या वाढदिवसानिमित्त कराडचे सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार, दीपक विभूते मित्र परिवाराने कराडच्या कॉटेज हॉस्पिटलला दिले स्वच्छतेचे साहित्य ;

वेध माझा ऑनलाइन  ।
आमदार अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमधील सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार, दीपक विभुते आणि मित्र परिवाराच्या वतीने कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाची स्वच्छता करण्याकरिता आवश्यक असे साहित्य देण्यात आले आहे यावेळी गणेश पवार मित्रपरिवाराच्या वतीने अतुलबाबांना शुभेच्छा देण्यात आल्या

सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार  दीपक विभूते आणि मित्र परिवाराच्या वतीने शहरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात.याच गणेश पवार यांच्या मोबाईलवरून पाठवलेल्या केवळ एका मेसेजवरून आमदार अतुल भोसले यांनी आपली   "कृष्णा'  ची स्वच्छतेची टीम पाठवून आपल्या स्वतःच्या खर्चाने हे कॉटेज हॉस्पिटल स्वच्छ करून घेतले होते 
गणेश पवार यांनी त्याच धर्तीवर आज येथील कोटेज हॉस्पिटलमधील स्वच्छता अभाधित राहण्याच्या ड्रीष्टीने पुन्हा एकदा पाऊल उचलत आमदार अतुलबाबांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून कॉटेज हॉस्पिटलला त्याठिकाणी स्वच्छतेसाठी आवश्यक असे साहित्य देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे 
त्यांनी आपल्या मित्रपरिवाराच्या वतीने आमदार अतुलबाबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देखील दिल्या आहेत

No comments:

Post a Comment