Monday, March 23, 2026

सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा; नीलम गोरे यांचे आदेश ; वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले? मंत्री जयकुमार गोरेंचा सवाल ; निलंबन तात्काळ स्थगित करण्याचे गोरेंची मागणी;

वेध माझा ऑनलाइन।
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष  भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचे पडसाद आज विधिमंडळात उमटल्याचं पाहायला मिळालं. सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेत जुंपली. सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज सादर करावं. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. पण, आता निलम गोऱ्हे यांनी दिलेले आदेश कायम राहणार का?  असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभापती राम शिंदे निलम गोऱ्हे यांच्या आदेशाला स्थगिती देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा SP यांच्या निलंबनाचे आदेश कायम राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभापती राम शिंदे हे, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार की, आदेश कायम ठेवणार? याबाबत चर्चा सुरू आहेत. 
भाजपच्या करारनाम्याचा शिवसेनेकडून हिशेब घेण्यात आला.  भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'मुळे महायुतीतील शिंदेसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य फुटल्याने भाजपची सत्ता आली. या घडामोडींचे विधिमंडळात आणि राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. 
 सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधान परिषदेत भाजप शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. एसपीचं निलंबन करण्याचे आदेश उपसभापती निलम गोऱ्हेंनी सरकारला दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्री गोरे म्हणाले...
दरम्यान  वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले? असा सवाल मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय. एसपींचं निलंबन तात्काळ स्थगित करण्याची मागणी जयकुमार गोरेंनी केलीये.
 
जयकुमार गोरेंचे आक्षेप...
शंभुराज देसाई,मकरंद पाटील हे मंत्री जि.प.आवारात गेलेच कसे?
देसाई,पाटील या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश का मोडले? 
वस्तुस्थिती समजून न घेता चर्चेवर आधारीत निलंबनाचे आदेश कसे दिले?
जि.परिषद निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था का मोडली?
बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ का केली?
पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश स्थगित करा
जि.परिषद आवारात पाच हजार कार्यकर्ते कोणाच्या आदेशाने आले?

सातारा जि. परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीनं 65 पैकी 35 जागा मिळवून बहुमत स्पष्ट केलं. तर, भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. साताऱ्यात बहुमतासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं 6 सदस्य फोडून स्वतःचा अध्यक्ष बनवला. भाजपनं शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले. भाजपनं एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. तर, इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.


No comments:

Post a Comment