वेध माझा ऑनलाइन
साताऱ्यातील एका नामांकित स्कूलमधील केअरटेकरने तब्बल 24 मुलांना मारहाण, धमकी देऊन त्यांचे लैगिंक शोषण, मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर सातारा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून संबंधित केअरटेकरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
इंग्रजी माध्यमाच्या एका नामांकित स्कूलमधील तीन मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्कूल प्रशासनातील अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून संबंधित केअरटेकरवर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्याला अटकही करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी काही मुलांचे लैगिंक शोषण आणि मारहाण करून पैसे उकळल्याचे समोर आले.
गेल्या काही वर्षांपासून त्याच्याकडून हा प्रकार सुरू होता यामुळे सातारा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment