Thursday, March 26, 2026

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुलबाबा भोसले यांनी शनिवारी (ता. २८) होणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे, की सध्याच्या शोकमय वातावरणात वाढदिवस साजरा करणे उचित नसून, या दिवशी ते नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा स्वीकारणार नाहीत. तसेच यादिवशी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, सत्कार किंवा उत्सव आयोजित करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून, सर्व सहकारी व कार्यकर्त्यांनीही साधेपणा पाळून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 


No comments:

Post a Comment