Saturday, March 14, 2026

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल ; २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी विमानवाहू व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्या पायाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तब्बल २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेली जुनी दुखापत पुन्हा बळावल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर मुरलीधर मोहोळ यांना आता किमान एक महिना सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.

 मुरलीधर मोहोळ हे एक निष्णात कुस्तीगीर होते पण...
राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ हे एक निष्णात कुस्तीगीर होते. २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या एका दुखापतीमुळे त्यांचे कुस्तीचे स्वप्न अर्धवट राहिले. त्यामुळे त्यांना कुस्ती कायमची सोडावी लागली होती. इतकी वर्षे त्यांनी या वेदनांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा त्रास प्रचंड वाढला होता. अखेर वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment