उंब्रज परिसरात छ शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहत आहे, मी याकामी नक्कीच मदत करणार... असा शब्द मी दिला होता... तो शब्द पाळण्यासाठी आज मी पुन्हा येथे आलो आहे... असे म्हणत भाजप चे कराड उत्तरचे नेते रामकृष्ण वेताळ यांनी या पुतळ्याच्या मूर्तिकारास 5 लाख रुपयांचा चेक देत... दिलेला आपला शब्द पाळला आहे... तसेच याकामी सर्वांनी मदत करावी अशी हाकदेखील त्यांनी यावेळी परिसरातील जनतेला दिली...
दरम्यान... याकामी दिलेला शब्द रामकृष्ण वेताळ यांनी पाळला आहे,... त्यामुळे परिसरातील पुढारी म्हणवणाऱ्या इतरांनीदेखील आपली जबाबदारी ओळखून या कामासाठी सढळ हाताने मदत करावी अशी अपेक्षा याच परिसरातील जनतेकडून व्यक्त होताना दिसत आहे...
No comments:
Post a Comment