वेध माझा ऑनलाइन।
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात साठा करू नये यासाठी सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे भारतात व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई जाणवत आहे. घरगुती गॅस उपलब्ध असला तरी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
ESMA कायदा नेमका काय आहे? :
सरकारने लागू केलेला Essential Services Maintenance Act हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतूक, आरोग्यसेवा, ऊर्जा आणि इंधन यांसारख्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होऊ नये हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
या कायद्याअंतर्गत सरकारला काही आपत्कालीन अधिकार मिळतात. जर कोणत्याही कारणामुळे अत्यावश्यक सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असेल तर सरकार थेट हस्तक्षेप करून आवश्यक आदेश जारी करू शकते. त्यामुळे गॅस, वीज किंवा वाहतूक यांसारख्या सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवता येतो.
.
No comments:
Post a Comment