वेध माझा ऑनलाईन - दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमयाक्रॉन व्हेरियंटने राज्याची चिंता वाढवली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकेडवारीनुसार, राज्यात आज 50 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुले राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 510 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तसेच आतापर्यंत 193 रुग्णांनी ओमायाक्रॉनवर मात केली आहे.
राज्यात आज 50 ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्णाचे रिपोर्ट आले आहेत. त्यापैकी 38 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर 12 रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत. पुणे मनपामध्ये आज 36 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवड मनपा येथे आठ रुग्णाची नोंद झाली आहे. तर पुणे ग्रामीणमध्ये दोन रुग्णांची नोद झाली आहे. ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 510 वर पोहचली आहे.
No comments:
Post a Comment