Saturday, January 15, 2022

मुंबईत कोरोना ओसरू लागला ! तर, पुण्यात थैमान घालतोय कोरोना...

वेध माझा ऑनलाइन - मुंबई-पुण्यात कोरोनाचा अक्षरश: हाहा:कार सुरु आहे. पण मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी आता ओसरताना दिसत आहे. तर दुसरीकडे पुण्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. पुण्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवनवे रेकॉर्ड मोडताना दिसत आहेत. पुण्यात आज दिवसभरात तब्बल 5 हजार 705 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकूण आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी पुण्यातील 2 आणि पुण्याबहेरील 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पुण्यात आज दिवसभरात 2 हजार 338 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात सध्या 22 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 22 आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर 22 रुग्ण आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. पुण्यात सध्या 31 हजार 907 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पुण्यात काल (14 जानेवारी 2022) 5480 कोरोना बाधितांची नोंद झाली आणि 2674 रुग्णांनी करोनावर मात केली. आजपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची खएकूण संख्या 548569 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 510793 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यात 13 जानेवारी रोजी 5571 नव्या रुग्णांची नोंद झाली होती आणि 2335 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.

No comments:

Post a Comment