वेध माझा ऑनलाईन - तीन जानेवारीपासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, रत्नागिरी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका मुलाला एकाच दिवसांत दोन डोस देण्यात आले आहेत. चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणावेळी ही धक्कादायक घटना घडली आहे.
दुर्गवाडी येथे 15 वर्षीय विद्यार्थीला 15 मिनिटांच्या अंतराने दोन डोस दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंधरा मिनिटांच्या अंतरात चक्क दोन डोस देण्याची करामत आरोग्य कर्मचारी यांनी केली. 15 मिनिटांच्या अंतराने दोन डोस घेतलेल्या विद्यार्थीला कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा मुलगा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारले असता हास्यस्पद उत्तर देण्यात आलं. मुलाला दोन डोस दिल्याची घटना चुकून झाल्याचं आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितलेय.
No comments:
Post a Comment