वेध माझा ऑनलाइन - पावसाळा ऋतू संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. असं असताना देखील महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. पूर्व भारत आणि आंध्र प्रदेशातील किनारी भागात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर भारतात दाट धुक्यासह थंडीचा कडाका वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढणार आहे.
मागील चोवीस तासात राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. धुळे जिल्ह्यात किमान तापमानात 3 अंशांची घसरण झाली आहे. काल येथील किमान तापमान 10.5 अंशावर होतं, आज हेच तापमान 7.6 अंशावर पोहोचलं आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर आणखी दाट झाली आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतं आहे. बुलडाणा जिल्ह्यात दाट धुके पडल्याने जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहतुकीला ब्रेक लागला आहे. तसेच रेल्वेसेवा देखील प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
No comments:
Post a Comment