Wednesday, January 5, 2022

कराड शहरात आजपासून मास्क सक्ती, मास्क न वापरल्यास होणार 500 रुपये दंड - कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणे गरजेचे...मुख्याधिकारी रमाकांत डाके...

वेध माझा ऑनलाइन
कराड
शहर व परिसरातून कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे लोकांनी कोविडचे नियम पाळून व्यवहार करणे आवश्यक आहे पण लोक कोणतेही नियम पाळत नसल्याचे दिसत आहे त्यामुळे आज पासून पोलिसांच्या सहकार्याने शहरातून मास्क वापरण्याबाबत सक्ती करण्यात येणार आहे शहरातून मास्क न घालणाऱ्याला 500 रुपये दंड आकारणी करण्यात येणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी डाके यांनी वेधमाझा शी बोलताना सांगितले कोरोनाचे सगळे नियम पाळले जाणे आवश्यक आहे निष्काळजी राहिल्यास पुन्हा शहराला लॉक डाऊनला सामोरे जावे लागेल असेही ते यावेळी म्हणाले

कोरोनाचा हाहाकार पुन्हा सम्पूर्ण राज्यातून व देशभरातही होताना दिसतोय मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरातून कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झाल्याचे चित्र असताना कराड मधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सध्या शहराचे प्रशासक म्हणून काम करत असलेले मुख्याधिकारी डाके यांनी लोकांनी कोरोना नियम काटेकोर पाळावेत असे आवाहन केले आहे

शहरातील वाढती कोरोनाची रुग्णसंख्या पाहता आज (गुरुवार )पासून सर्व महत्वाच्या चौकांमधून पोलिसांच्या सहकार्याने शहरात मास्क सक्ती करण्यात येणार आहे जे मास्क घालणार नाहीत त्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे सॅनिटायझर चा वापर तसेच कोरोना चे सर्व नियम पाळले जाणे महत्वाचे आहे त्यासाठी आजपासून कडक नियमावली करण्यासाठी मुख्याधिकारी डाके सरसावले आहेत

शहरातील दुकानांमधून कामगार असो किंवा त्या दुकानात येणारे गिर्हाईक असेल या दोघांनीही कोरोनाची लस घेणे कम्पलसरी आहे तसे नसल्याचे निदर्शनास आल्यास दंडाला सामोरे जावे लागणार आहे आजपासून शहरातील सर्व उद्याने बंद करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे येथील कोल्हापूर नाका येथे उद्या (शुक्रवार ) पासून नाक्यावरून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे सव्याब टेस्टिंग चालू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले तसेच शहरातील अन्य काही ठिकाणी देखील सव्याब टेस्टिंग पॉईंट उभे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आम्ही सर्वच गर्दीच्या ठिकाणी अधिक कडक नियम करण्याबाबत निर्णय घेणार आहोत कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहरात काय-काय बंद करायचे याबाबत कराडच्या प्रांत अधिकाऱ्यांचा आदेश आज पारित करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले

No comments:

Post a Comment