Friday, March 3, 2023

कागदावरची शिवसेना 40 चोरांची मात्र, जनतेच्या मनात शिवसेना बाळासाहेबांची ; संजय राऊत यांचे कराडात वकव्य ;

वेध माझा ऑनलाईन - 
जे 40 चोर शिवसेनेतून पळून गेले आणि त्यांनी पैशाच्या जोरावर पक्षचिन्ह आणि शिवसेनेचे नाव विकत घेण्याचा प्रयत्न केला मी त्यांच्याबद्दल बोललो मी विधीमंडळ बद्दल बोललो नाही मी पण पत्रकार आहे गेली 30 वर्षांहून अधिक काळ संसदेत काम करतो मी कोणी असभ्य माणूस नाही  मलाही बोलायचं कळत मी कोणता हक्क भंग केला?असा उलटा सवालच आज कराडात संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आणि आपल्या चोर मंडळ या वादग्रस्त विधानावर सारवासारव केली दरम्यान कागदावर 40 चोरांची शिवसेना असली तरी जनतेच्या मनात बाळासाहेबांची शिवसेना असल्याचे सूतोवाच राऊत यांनी आज कराडात येऊन केले गद्दारांना जनताच धडा शिकवेल असे म्हणत त्यांनी मंत्री शंभूराज देसाई यानाही नाव न घेता जोरदार टोला हाणला

नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देण्याकरिता शिवसेना नेते संजय राऊत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शहर व परिसरातील शिवसैनिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय राऊत यांचे आगमन होताच त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देखील यावेळी उपस्थित युवक व शिवसैनिकांनी दिल्या

दरम्यान आज त्यांनी कराडला येण्यापूर्वी सांगलीमध्ये बोलताना निवडणूक आयोगावर टीका केली त्यावेळी त्यांची जीभ घसरली त्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता... मग काय करू? त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन निर्णय दिलेले चालतात का? असा उलटा सवाल करत... मराठी भाषा आहे...तुम्ही समजून घ्या असे म्हणत राऊत यांनी आपली बाजू मांडली

ते पुढे म्हणाले कोण म्हणतं शिवसेना संपली असे म्हणणारे जे कोणी असतील त्यांनी कराड ,सातारा व पश्चिम महाराष्ट्रात येऊन पहावं मग कळेल...शिवसेना ही फ़क्त बाळासाहेब ठाकरें आणि जनतेचीच आहे  40 चोरांनी कागदावर शिवसेना घेतली पण लोकांच्या मनातील शिवसेना ते चोरू शकत नाहीत त्या चोरांबद्दल लोकांच्या मनात चीड आहे आम्ही सगळे शिवसेना नेते शिवगर्जना संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात फिरून हे सगळं पाहतोय

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत बोलताना ते म्हणाले असे रोज पाच पंचवीस हल्ले कोणावर ना कोणावर होतच असतात...कोण संदीप देशपांडे? असे म्हणत त्यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची खिल्ली उडवली 
नितेश राणेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले त्यांचा मेंदू टीलला आहे त्यांचं सगळंच टील्ल आहे अशा भाषेत राणे यांचीही त्यांनी खिल्ली उडवली

No comments:

Post a Comment