Thursday, March 16, 2023

कराड रोटरी क्लबच्या वतीने पोलिसांसाठी आरोग्य शिबोराचे आयोजन ; 120 पोलीस बंधू भगिनींनी नोंदवला सहभाग ;

वेध माझा ऑनलाईन - सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून आणि सातारा रोटरी कॉप्स यांच्या सहकार्यातून दि.15 मार्च रोजी रोटरी क्लब ऑफ कराड याच्यावतीने कराड शहर व तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस बंधू-भगिनींसाठीसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते.  
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी,डॉ. रणजीत पाटील यांचे हस्ते करण्यात आले. रणजीत पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये रोटरीच्या समाजकार्याचे कौतुक केले व पोलिसांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार मानले. या शिबिरामध्ये डॉ. राहुल फासे शेखर कोगणूळकर  संतोष टकले  विजयसिंह पाटील दिलीप सोलंकी मोहन संनाळे डॉ. भाग्यश्री पाटील या सर्वांनी आपली वैद्यकीय सेवा दिली. 
यावेळी एकूण 120 रुग्णांची आरोग्य तपासणी  करण्यात आली. यावेळी सर्व सेवा देणाऱ्या  डॉक्टरांचे डॉ. रणजीत पाटील साहेब यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व रोप देवून सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी कराड शहर व कराड तालुका पोलीस स्टेशन मधील पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्ग, तसेच रोटरी क्लब ऑफ सातारा चे प्रद्युम्न आगटे, तसेच रोटरी क्लब ऑफ कराड चे अध्यक्ष प्रबोध पुरोहित, सचिव चंद्रशेखर पाटील, राजेश खराटे, राजेंद्र कुंडले, राजीव खलिपे, रामचंद्र लाखोले, अभिजीत चाफेकर, सौ सीमा पुरोहित, इतर सदस्य व रोटरॅक्ट क्लब ऑफ कराड सीटी चे आकांक्षा तिवारी, अमित भोसले, नील देशपांडे, वैभव उमराणी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment