वेध माझा ऑनलाईन - दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राधा नागनाथ आवटे ही विद्यार्थिनी दहावीची परीक्षा देऊन घरी जात होती, तेव्हा तिच्या अंगावर जळणारं झाड पडलं. पंढरपूर तालुक्यातल्या करकंब जवळच्या बार्डी रोडवर ही घटना घडली आहे.राधा आवटे पेहे येथील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर देऊन घरी परत जात होती, तेव्हाच हा अपघात झाला दरम्यान या झाडाला नेमकी आग कशी लागली, याचा तपास यंत्रणा करत आहेत
16 वर्षांची राधा नागनाथ आवटे बादलकोटची राहणारी होती. दहावीचा पेपर संपल्यानंतर राधा तिचा भाऊ संदीप याच्या सोबत मोटारसायकल वरून ढेकळेवाडीला नातेवाईकांकडे जात होती. बार्डी रोड वरील एमएसईबी कार्यालयाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला असलेलं पेटलेलं झाड राधाच्या अंगावर पडलं, त्यामध्ये राधाच्या डोक्याला जोराचा मार लागला. अपघातानंतर राधाला करकंब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच राधाचा मृत्यू झाला. या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment