Thursday, March 16, 2023

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची साताऱ्यानजीक मौहुली येथे समाधी ?

वेध माझा ऑनलाईन - छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची समाधी सातारा शहरालगत असणाऱ्या माहुली या गावात असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणी दगडी वृंदावन आणि घुमटी असल्याचे समोर आले आहे.
महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध घेण्याचे काम अनेक वर्षांपासून सुरू होते. अखेर माहुली या गावामध्ये येसूबाई यांची समाधी असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. महाराणी येसूबाई यांच्या समाधीबाबत गेली अनेक वर्षे साशंकता व्यक्त केली जात होती अखेर आज महाराणी येसूबाई यांची समाधी सापडली आहे.

No comments:

Post a Comment