वेध माझा ऑनलाइन - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जावळी तालुक्यातील कुडाळ येथे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास युवकांची तुफान गर्दी झाली हाेती. या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने अदाकारी सादर केल्यानंतर तिचा आमदार शिवेंद्रराजेंनी साडी चोळी देऊन सन्मान केला.
आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा 30 मार्चला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस आधीपासूनच सातारा तालुक्यासह जावली तालुक्यात कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक उपक्रम माेठ्या प्रमाणात साजरे केले जात आहेत.जावली तालुक्यात आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्टेजवर डान्स केला. आमदार शिवेंद्रराजे त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्टेजवर हात वर करून थिरकलेले पाहायला मिळाले
No comments:
Post a Comment