Friday, March 3, 2023

डॉ अतुलबाबांच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून सुचना ; ट्राफिक लग्गेच झाली पूर्ववत

वेध माझा ऑनलाईन - पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड जवळ उड्डाण पूल पाडण्याच्या कामामुळे आज सकाळपासून ट्रॅफिकचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला. जवळपास 3 ते 4 तास वाहनचालकांना तसेच प्रवाशांना वाहतुक कोंडीत अडकले होते.यासंबंधी परिसरातील काही नागरिकांशी चर्चा करून तसेच कराडच्या काही पत्रकारांशी याबाबत बोलून भाजपचे नेते डॉ अतुल भोसले यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी त्वरित फोनवर बोलून ही अडथळ्यांची ट्रॅफिक क्लिअर केली 

भाजप नेते अतुल भोसले यांनी या ट्राफिकच्या अडथळ्यां संदर्भात कराडच्या   ट्रॅफिकमुळे त्रासलेल्या नागरिकांकडून माहिती घेतली तसेच काही पत्रकारांशी याबाबत चर्चा केली त्यावेळी येथील तसेच ट्रॅफिकमुळे नागरिकांचे हाल होत असल्याची माहिती त्यांना मिळाली तसेच महामार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक असल्याने दहावी- बारावीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना आज त्रास झाला अशी माहिती मिळताच अतुल भोसले यांनी सदर कंपनीच्या संबंधित  अधिकाऱ्यांना फोन केला व  लवकरात लवकर ट्रॅफिकची समस्या सोडविण्यासाठी सूचना केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच ट्रॅफिकची समस्या सुटली. त्यामुळे अतुलबाबाचा एक फोन झाला अन् ट्रॅफिक क्लिअर झालेले पहायला मिळाले.

No comments:

Post a Comment