वेध माझा ऑनलाईन - कराडचे अपक्ष नगरसेवक इंद्रजित गुजर यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत उद्या कराडमध्ये येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे इंद्रजित गुजर यांची काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी देखील भेट घेतल्याची माहिती आहे या नव्याने घडणाऱ्या घडामोडीमुळे कराडच्या राजकारणात आता उद्धव ठाकरे गटाची एन्ट्री होणार आहे असेही संकेत यानिमित्ताने मिळत आहेत
कराड शहराचे राजकारण आता नव्याने ढवळून निघत असल्याचे सध्या चित्र निर्माण झाले आहे काही दिवसांपूर्वी कराडच्या यशवंत विकास आघाडीने मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केल्याने येथील राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या त्यानंतर खडबडून जागे झालेल्या काँग्रेसने काही दिवसातच काँग्रेस नेते नाना पटोले यांचा कार्यक्रम लगेचच कोलेजवर अरेंज केला होता राष्ट्रवादीचा मेळावा देखील शहराच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचदरम्यान झाला होता काँग्रेस- राष्ट्रवादी चे एकत्रित मनोमिलन होण्याबाबतच्या चर्चा त्यानंतर कानावर यवू लागल्या होत्या त्यानंतर भाजप- शिंदे गट एकत्रित येऊन दोन्ही काँग्रेसशी शहराच्या निवडणुकीत दोन हात करतील अशी शक्यता बोलून दाखवली जात होती मात्र महाआघाडी म्हणून लढण्यासाठी कराडात शिवसेना म्हणावी अशी तुलनेत स्ट्रॉंग नाहीये दरम्यान त्याचवेळी अचानकपणे अपक्ष नगरसेवक इंद्रजित गुजर व त्यांचे शहरातील अनेक आजी-माजी काही सहकारी यांची शिवसेना नेते विनायक राऊत यांच्याशी त्याचकाळात भेट झाल्याची बातमी अचानक धडकली मग मात्र कराडात काहीतरी वेगळं घडतय अशा अटकळी कराडच्या राजकारणात व्यक्त होऊ लागल्या उद्या शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत इंद्रजित गुजर याना भेटण्यासाठी अचानक कराडात येत असल्याची बातमी असल्याने त्यातून भविष्यात शहरात महाआघाडी होण्याबाबतचे परफेक्ट प्लॅनिंग तर शिजत नाही ना ? अशा चर्चा आता सुरू आहेत
दरम्यान राज्यातील परिस्थिती पाहिली तर ग्रामपंचायत निवडणूका असो, पदविधरच्या असो... किंवा नुकत्याच झालेल्या पुण्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका असोत...महाविकास आघाडीने पुन्हा कम-बॅक केल्याचे पहायला मिळत आहे लोक भाजप विरोधात मतदान करत असल्याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता आलेला दिसतोय त्याचाच धागा पकडून कराडमध्येही महाआघाडीचा यशस्वी प्रयोग करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाची एन्ट्री कराडमध्ये होणार अशी माहिती मिळत आहे शिवसेना म्हणून पारंपरिक काही मते शहरात नक्कीच आहेत त्यातच आता नव्याने शहरातील काही आजी माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या कॅप्टनशिप खाली शिवसेनेत प्रवेशकर्ते झाल्यास स्ट्रॉंग महाविकास आघाडीचे चित्र शहराच्या राजकारणात दिसेल अशी विश्लेषकाना खात्री वाटतेय आणि याचीच नांदी संजय राऊत यांच्या अचानक जाहीर झालेल्या कराड दौऱ्यातील इंद्रजित गुजर यांच्या भेटीने होईल का? हेच आता पहायचे आहे
No comments:
Post a Comment