वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून सावरला आहे. पण आता H3N2 या नव्या इन्फल्युएंझा व्हायरसमुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण पसरलं आहे. राज्यात 3 जणांचा H3N2 व्हायरसने मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागतील का अशी चर्चा रंगली होती. पण, राज्यात ज्यांना H3N2 ची लक्षणं जाणवत असतील किंवा ज्यांना खोकला असेल अशा रुग्णांनी मास्क वापरावे, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसंच, तातडीने उपचार सुरू केल्यास आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावे. याबाबत अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्या.
'या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत. यासाठी लागणारा औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. तसेच सध्या सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उपचार करण्यात अडचण येऊ नये यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी आणि आवश्यकता वाटल्यास खासगी कंत्राटी कर्मचारी नेमुन उपचाराचे काम सुरू ठेवावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.
इन्फल्युएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फल्युएंझाचे टाईप A B आणि C, असे प्रकार आहेत. इन्फल्युएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला,घशात खवखव , धाप लागणे , न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात.
यासाठी कोविड 19 / इन्फल्युएंझा बाबतीत नियमित रुग्ण सर्वेक्षण, सहवासितांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. यात, रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसात फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.
सर्दी, खोकला अंगावर काढु नका त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लुवरील औषध सुरू करावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू केलेल्या उपचारा सोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी. खोकला असल्यास मास्क किंवा 3 पदर करुन हात रुमाल वापरावा.आजारी व्यक्ंतीनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सुचनांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment