वेध माझा ऑनलाईन - केंद्र सरकारकडून दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांच्यावर कारवाई झाली. अशा अनेक घटना अनेक राज्यात घडल्या आहेत. काही ठिकाणी तर ज्यांच्यावर खटले भरले ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील केसेस काढण्यात आल्या. त्याची माहिती आम्ही पत्रात दिली. त्यावर फेर विचार करावा अशी विनंती करण्यात आली आहे. मात्र, देशात सध्या केंद्रीय तपास यंत्रणेचा गैर वापर सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी केला. शरद पवार यांनी यावेळी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबाबत 9 विरोधी पक्षनेत्यांनी केंद्राला पाठवलेल्या पत्राबाबत भूमिका स्पष्ट केली
आज कराड येथे शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी पवार म्हणाले की, केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांवरील केसेस मागे घेतल्या जातात आणि इतर पक्षांच्या लोकांवर कारवाई होते असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment