कराडमध्ये मुजावर कॉलनी येथे पिण्याच्या पाण्यात तेथील ड्रेनेज चे पाणी मिसळत असल्याचे लोकांच्या निदर्शनास आले होते त्याविषयी तक्रार करूनही पालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्याची सामाजिक कार्यकर्ते व आपले कराड ग्रुपचे अडमिन संजय चव्हाण यांची तक्रार होती शहरात रस्ता खुदाई करताना काही लिकेजेस राहिले होते मात्र लोकांच्या आरोग्याचा विचार करून ते तात्काळ काढले गेले नाहीत पालिका तिकडे सपशेल दिर्लक्ष करतेय असे लक्षात आले यामुळे भविष्यात त्याठिकाणी काही आरोग्याच्या समस्या वाढल्या तर त्याची जबाबदारी पालिका अधिकारी घेणार का? असा सवाल करत वेध माझा ने याबाबतीतील रोखठोक बातमी प्रसिद्ध करून पालिकेची यंत्रणा ताबडतोब हलवली होती
दरम्यान, त्याठिकाणी पालिकेने काढलेल्या खड्यात ड्रेनेज युक्त पांढऱ्या रंगाचे पाणी निदर्शनास आले होते... पिण्यासाठी देखील त्या परिसरात तसेच पाणी येत असते असेही त्याठिकाणच्या रहिवाशयांनी वेध माझाशी बोलताना सांगितले .ते लोक म्हणाले...आम्ही येणारे पाणी पहिल्यांदा बराच वेळ तसेच सोडुन देतो...त्यानंतर काही कालावधीने पिण्यासाठी ते भरतो...तरी त्या पाण्याला वास येत असतो...उकळून पिण्यासाठी देखील हे पाणी योग्य वाटत नाही...पण आम्हाला पर्याय नाही...अशी अजून काही दिवस परिस्थिती राहिली तर त्याठिकाणी विविध आजार सुरू होतील की काय... अशी भीती व्यक्त होत होती...त्या ठिकाणी काढलेले खड्डे रस्त्यापासून अंदाजे तीन फूट खोल आहेत... त्या खड्यात लहान तोंडाची पाण्याची लाईन आहे त्यामुळे खड्डे काढूनही लिकेज लवकर सापडेल अशी त्याठिकाणी परिस्थिती नाही... एवढ्या खाली पाण्याची लाईन बसावण्यापेक्षा अजून फूटभर वर उचलून घेऊन बसवल्यास त्याठिकाणचा हा प्रॉब्लेम सुटू शकतो असे तज्ञांचे मत वेध माझा ने आपल्या बातमीतून व्यक्त केले होते त्याप्रमाणे पाईप लाईन टाकण्याचे काम तेथे आजपासून सुरू झाले आहे यामुळे घाण पाण्याचा प्रॉब्लेम सुटून स्वच्छ पाणी तेथील नागरिकांना पिण्यासाठी मिळणार आहे अशी खात्री पालिकेचे अधिकारी तेवरेंनी वेध माझाशी बोलताना दिली आहे वेध माझाने हा विषय लावून धरल्याबद्दल वेध माझाचे शहरातील विविध भागातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे जोपर्यत त्याठिकाणच्या लोकांना प्रत्यक्षात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत वेध माझा त्याठिकाणी आपली नजर ठेवून असणार आहे
No comments:
Post a Comment