Monday, March 6, 2023

मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या टोळीविरुद्ध मोक्काची कारवाई ; सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांची पत्रकार परिषदेत माहिती

वेध माझा ऑनलाईन - सातारा शहरात शंभरहून अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या मटका किंग समीर कच्छी याच्या टोळी विरुद्ध सातारा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मटकाकिंग समीर कच्छीसह त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का लावण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी आज सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सातारा पोलिसांकडून मोक्का अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. यावेळी समीर शेख म्हणाले की, सातारा येथील समीर कच्छी याच्या टोळीवर पोलिसांच्यावतीने नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. सातारा जिल्हयामध्ये समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी हा त्याच्या कच्छी गैंग च्या साथीदारांच्या मार्फतीने लपुन छपुन पोलिसांच्या नजरेआड राहून मटका ,जुगार सारखे अवैध धंदे चालवत होता. तसेच मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करुन तो सामान्य कुटुंबातील गरजू लोकांना व्याजाने पैसे देऊन लोकांची पिळवणूक करीत असल्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या.स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचुन दि.१९ फेब्रुवारी रोजी सगीर कच्छी याच्या मोळाचा ओढा येथील राहत्या घरी छापा टाकला. यावेळी संबंधित ठिकाणी समीर कच्छी व त्याचे साथीदार मटका,जुगार चालवित असताना आढळून आले. त्यांना तात्काळ ताब्यात घेत त्यांच्याकडून १६ लाख २६ हजार ७० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तसेच त्यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


No comments:

Post a Comment