Thursday, March 16, 2023

महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कराडातील अभिनेते हेमंत पाटील यांची निवड ; हेमंत पाटील यांचे पृथ्वीराज बाबांनी केले अभिनंदन ;

वेध माझा ऑनलाईन - महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी च्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा  विद्याताई कदम यांच्यावतीने सांस्कृतिक विभागाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कराडातील सर्वपरिचित व्यापारी व अभिनेते हेमंत पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हेमंत पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत  
हेमंत पाटील हे कराडातील नामांकित व्यापारी आहेत अभिनयाची त्यांना आवड आहे आपली आवड जोपासत त्यांनी गेली 22 वर्षे  विविध चित्रपटातून आपल्या छोट्या मोठ्या अभिनयाने प्रेक्षकांमधून अनेकदा वाहवा मिळवली आहे अभिनय क्षेत्राबरोबरच त्यांनी चित्रपटाच्या प्रोडक्शन विभागात, फिल्म कोओरडीटेटर म्हणून तसेच कास्टिंग डायरेक्टर अशा विविध विभागात यशस्वीरीत्या काम केले आहे त्यांची सिने व टीव्ही क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांशी खूप जवळची मैत्री आहे सध्या त्यांची शोध सावल्यांचा ही वेब सिरीज मोठा धुमाकूळ घालत आहे
त्यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे

1 comment: