वेध माझा ऑनलाईन - कराडात पालिका निवडणुकीत अचानक जुन्या जनशक्ती आघाडीला पुढे करून काँग्रेस ही निवडणूक लढेल तसेच आपल्याला विश्वासात न घेता बाबा गटात निवडी होतात आपल्याला देखील तशाच पद्धतीने न सांगता पदावरून हटवले गेले अशा भावना पृथ्वीराज चव्हाण गटातील काही जणांच्या झाल्यामुळे ठाकरे गटाचा पर्याय या नाराज लोकांनी निवडला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्यामुळे जरी हे लोक आपल्या अस्तित्वासाठी बाबा गटातुन वेगळे झाले असले तरी पालिका निवडणुकीत महा आघाडीच्या माध्यमातुन पुन्हा हे एकत्र दिसतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते
नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने यांनी आपला स्वतंत्र गट निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते अप्पा माने हे काँग्रेस चे शहर अध्यक्ष होते त्यांना विश्वासात घेतले नाही आणि अचानक पदावरून हटवण्यात आले अशी भावना अप्पा मानेंसह बाबा गटातील अनेकांची झाली व त्यातून नाराजी पसरत ठाकरे गटाची एन्ट्री कराडात झाली आहे
दोन दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंद्रजित गुजर यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिली मात्र त्यापूर्वी सेना नेते विनायक राऊत हे देखील इंद्रजित गुजर याना भेटले असल्याची बातमी होती शिवसेनेतून त्यांना ऑफर दिल्याचे वृत्त आहे स्वतः गुजर व त्यांच्याबरोबर असणारे शहरातील आजी माजी काही नगरसेवक ठाकरे सेनेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचेही समजते सुरुवातीला शिवसेनेच्या कोणत्या पदावर गुजर यांच्यासह त्यांच्या समर्थकाना पद ऑफर केले जाते कोणत्या पदावर तडजोड होते हे बघून त्यावर चर्चा होऊन मगच गुजर व त्यांच्या आजी माजी सहकाऱ्यांचा मातोश्रीवर जाऊन किंवा कराडात मोठा कार्यक्रम घेऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचेदेखील वृत्त आहे कराड पालिका निवडणुकीत अचानकपणे जुनी जनशक्ती आघाडी बाबा गटाचे नेतृत्व करणार आणि आपण मागे पडणार तसेच आपल्याला बाबा गटातून संधी मिळणार नाही असाच अचानक डच्चू दिला तर पर्याय काय ? या विवनचनेत असणाऱ्या नाराजांची ठाकरे गटात प्रवेश होण्याची प्रक्रिया होणार असली तरी ऐन पालिका निवडणुकीत बाबा गटासाहित होणाऱ्या महाआघाडीचे सदस्य म्हणून हेच नगरसेवक ठाकरे गटाच्या माध्यमातून पुन्हा बाबा गटाबरोबर हातात हात घालून एकत्र येत भाजप- शिंदे गटाशी दोन हात करण्यासाठी शहरात पुन्हा एकत्र दिसतील असेही समजते
सध्या महाआघाडीचा प्रयोग एकूणच झालेल्या
आत्तापर्यंतच्या निवडणुकीसाठी राज्यात यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे याचाच धागा पकडून कराड पालिकेसाठी देखील महाआघाडी होणार हे निश्चित मानले जात आहे परंतु कराडात दोन काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेचे म्हणावे असे प्राबल्य नाही म्हणूनच महाआघाडीची ताकद कराडात वाढावी यासाठीच नगरसेवक गुजर यांचा ठाकरे गटात होणारा प्रवेश ही एक खेळी तर नाही ना ? अशीही चर्चा सध्या सुरू आहे...चर्चा काहीही असली तरी नेमका हा प्रकार काय आहे ? हे पाहण्यासाठी आपल्याला कराड पालिका निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार हे मात्र निश्चित!
No comments:
Post a Comment