वेध माझा ऑनलाईन - राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. फडणवीस यांनी अक्षरशः यावेळी घोषणांचा पाऊस पाडला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी भरगोस निधी दिला. ना शंभूराज देसाई यांच्यामार्फत या बजेट मधून साताऱ्यासाठी देखील अशीच भरीव तरतूद करण्यात येईल अशी अपेक्षा जिल्हावासीयांना होती. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात ही अपेक्षा फोल ठरली एकीकडे भाजप ने राज्यात विविध वर्गासाठी मोठी आश्वासने देत वाहवा मिळवली तर दुसरीकडे पालकमंत्री देसाई यांच्याबाबत मात्र जिल्ह्यात नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे डॉ अतुल भोसले यांनी कराडसाठी 54 कोटी रुपये याच बजेटच्या माध्यमातून आणले मात्र पालकमंत्री असूनहो मंत्री देसाई जिल्ह्यात काहीच ठोस तरतूद आणू शकले नाहीत याचे आसचर्यही जिल्ह्याला यानिमित्ताने आवर्जून आहे
ठाकरे सरकारच्या काळात अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी संग्रहालयाला १२ कोटी, पाटण तालुक्यात १०० खाटांचे रुग्णालय, कराड येथील पाचवड पुलासाठी ४५ कोटींची तरतूद आणि पाचगणीसाठी १०० कोटींची तरतूद त्यावेळी तत्कालीन ठाकरे सरकारकडून केली होती. २०२१ च्या अर्थसंकल्पात सातारा सैनिक स्कुलसाठी तब्बल ३०० कोटींचा निधी देण्यात आला होता . तसेच जिल्ह्याला काही वाढीव निधीही दिला होता मधल्या ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात सातारा पोलीस दलाने महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबवला होता. पुढे राज्यभर या उपक्रमाची अमलबजावणी करण्यात आली. याशिवाय अजितदादांनी त्यावेळी वुमन्स हॉस्पिटलच्या आस्थपणाला मंजुरी दिली होती. सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील शाळेस १ कोटी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतापसिंह हायस्कुलला १ कोटी निधी दिला होता.मात्र सध्याच्या अर्थसंकल्पात काहीतरी ठोस असं सातारा जिल्ह्यातील जनतेला हे सरकार देईल अशी अपेक्षा होती मात्र वाई येथील विश्वकोश मंडळासाठी नव्या इमारतीची घोषणा वगळता एकही ठोस घोषणा झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून नाराजी व्यक्त होताना दिसते आहे आणि याचे खापर पालकमंत्री शंभूराज देसाई त्यांच्यावर जनता फोडताना दिसत आहे पालकमंत्री या नात्याने मंत्री शंभूराज देसाई संपूर्ण जिल्ह्यांतून सायरन वाजवत सर्वत्र फिरत असतात यांच्याकडूनच लोकांना या बजेटमधून काहीतरी ते ठोस करतील अशा अपेक्षा होत्या जिल्ह्यासाठी काहीच मोठी तरतूद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसल्याचे आसचर्य देखील सध्या जिल्ह्यातून व्यक्त होताना दिसतंय
No comments:
Post a Comment