वेध माझा ऑनलाईन - श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीच्या मैदानाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आ.आनंदराव पाटील,राजेंद्रसिह यादव,हणमंतराव पवार, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले राजेंद्रसिंह यादव व विजयसिंह यादव मित्र परिवाराच्यावतीने महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेल्या या बैलगाड्या शर्यतीचे केलेले आयोजन शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.अशा स्पर्धामुळे बैलांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असुन शेतकरी वर्गात उत्साह आला आहे.
श्रीमंत छ.खा.उदयनराजे यांचे कराडमधे आगमन झाल्यावर त्यांनी प्रथम शिवतिर्थावरील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.त्यानंतर विजयसिह यादव यांच्या नेतृत्वाखाली मोटारबाईक रॅलीने उदयनराजेंना शर्यतस्थळी नेले यावेळी ठिकठिकाणी नागरीकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले यामुळे श्रीमंत.छ.खा.उदयनराजे भारावुन गेले.
या शर्यतीमध्ये सातारा,सांगली, कोल्हापुर व पुणे जिल्ह्यातील 300 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या.हजारो शौकीनांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या स्पर्धेत.बैलगाड्या विजेत्या ठरल्या यामध्ये प्रथम क्रमांक ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडी दुसरा क्रमांक वाघजाई प्रसन्न दिनेश भांडले पुणे कळंबी तिसरा क्रमांक ईश्वरी चंद्रकांत शेलार चौथा क्रमांक बाबू माने हरणीकि पाचवा क्रमांक अमोल माने सोन्या शंभू ग्रुप नरसिंहपुर सहावा क्रमांक रमेश जाधव सुपणे सातवा क्रमांक भानुदास वगैरे कासेगाव या सातही गाड्यांना रोख रक्कम व छत्रपती चषक श्री विजयसिंह यादव यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी या बैलगाडी शर्यती अतिशय चांगल्या प्रकारे शांततेने व पारदर्शकपणे संपन्न झाल्या यावेळी नगरसेवक हणमंत पवार , विजय वाटेगावकर, स्मिताताई हुलवान , बाळासाहेब यादव , किरण पाटील, गजेंद्र कांबळे, प्रीतम यादव ,निशात ढेकळे, ओंकार मुळे, विनोद भोसले राहुल खराडे तसेच कराड नगरपरिषद , सामाजिक, शैक्षणिक प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचा शुभारंभ हजारमाची गावचे उपसरपंच प्रशांत यादव यांच्या हस्ते संपन्न झाला
हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्रसिंह यादव, विजयसिंह यादव मित्रपरिवार व संयोजक राजूभाऊ सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी जयवंतराव वीर कायदे नितीन भाऊ आवळे पिंटू पाटील , योगेश पळसे, नरेश गुप्ता योगेश कोरडे तसेच पंच म्हणून आबासाहेब जाधव,उदयसिंह पाटील, दादा अशोक मदने सागर धोकटे यांनी काम पाहिले
No comments:
Post a Comment