वेध माझा ऑनलाईन - राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता H3N2 संसर्गजन्य व्हायरसने डोक वर काढलं आहे. मागील तीन दिवसांमध्ये राज्यात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेऊन नवे आदेश दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज H3N2 संसर्गाबाबत बैठक घेतली आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड / H3N2 हे दोन्ही संसर्गजन्य असून दोघांचीही लक्षणही सारखी आहेत
त्याच बरोबर गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे. तसेच सर्दी खोकला यासारखी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांच्या सल्यानुसार औषध घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी दिल्या आहेत. तसंच, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरण्याचे आवाहन करण्याबाबत सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये H3N2 बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील H3N2 बाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या तीनवर पोहोचली आहे.
No comments:
Post a Comment