वेध माझा ऑनलाईन - पाटण तालुक्यातील शिद्रुकवाडी येथे गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये 2 जण जागीच ठार झाले अशी माहिती मिळाली आहे या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हल्लेखोर मदन कदम यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोळीबार केल्याची माहिती समजताच पाटण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करित आहेत. पाटण तालुक्यातील मोरणा विभागात झालेल्या गोळीबारामुळे तालुक्यातील तणावाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment