वेध माझा ऑनलाइन - टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. केदार जाधवचे वडील महादेव जाधव गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास केदारचे वडील बेपत्ता झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार केदार जाधव याचं कुटुंब कोथरूड भागात राहतं. महादेव जाधव आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास रिक्षाने बाहेर गेले, पण आतापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महादेव जाधव यांच्याजवळ असलेला फोनही बंद आहे. केदार जाधवच्या कुटुंबाने पोलिसांकडे महादेव जाधव हरवल्याची तक्रार दिली आहे. आता पोलीस महादेव जाधव ज्या रिक्षेने गेले, त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. रिक्षाचालकाचा शोध लागल्यानंतर केदार जाधवचे वडील रिक्षेतून नेमके कुठे उतरले आणि नंतर कुठे गेले, याचा शोध घेणं पोलिसांना सोपं जाणार आहे.
2019 वनडे वर्ल्ड कपनंतर केदार जाधव टीम इंडियाकडून खेळलेला नाही. सुरूवातीपासूनच केदार जाधव महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत आहे. रणजी ट्रॉफीच्या या मोसमातही केदार जाधव महाराष्ट्राकडूनच खेळला आहे. अनेक वर्षांपासून केदार जाधव हा पुण्यात राहत आहे.
No comments:
Post a Comment