वेध माझा ऑनलाइन - सावरकर हे देशाचा अभिमान आहे. राहूल गांधी यांना त्या जेलमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या घाण्याला जुंपलं पाहिजे. मग त्यांना कळेल. आज ही ते म्हणाले की माफी मागायाला मी सावरकर आहे का? त्यांना याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहामध्ये निवेदन दिलं. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या सावरकर विधानावरून टीका केली.
'हा कायदा काँग्रेसने केला आहे. त्यानुसार लालू प्रसाद यादव आणि इतर लोकांवर यांची कारवाई झाली. त्यावेळी कोणी निदर्शने केली नाही. त्यावेळी कोणी म्हणाले नाही की लोकशाही धोक्यात आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी अध्यादेश फाडला होता. लोकसभेने ती कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही. रस्तावर फिरु देणार नाही. ओबीसी समाजाचा अवमान केल्यामुळे त्याचा जाहीर निषेध करतो, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवरील कारवाईचं समर्थन करत आज टीका केली.
No comments:
Post a Comment