Sunday, March 5, 2023

शंभूराज देसाई यांनी शिवसेनेशी गद्दारी केली म्हणून माझा पराभव झाला ; आता त्यांनी निवडणुकीत उभं रहावं, त्यांची सत्तेची मस्ती उतरवणार ; हर्षद कदम

वेध माझा ऑनलाईन - शंभूराज देसाई हे गद्दारच आहेत मी जिल्हा परिषदला उभा असताना यांनी त्यावेळी पण पक्षाशी गद्दारी केली आणि माझा पराभव घडवून आणला पण माझं डिपॉझिट जप्त झाले नाही याची त्यांना माहिती घ्यायला सांगा त्यांना ठाकरेंनी मोठं केलं आहे ते जेवढं बोलतात तेवढे ते मोठे नाहीत विधानसभा निवडणुकीसह पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जनता काय अवस्था करतेय ते आता बघाच... असा थेट इशारा ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी मंत्री शंभूराज देसाई याना आज पत्रकारांशी बोलताना दिला

ते म्हणाले देसाई यांच्या स्वभावातच गद्दारी आहे त्यांना ज्या शिवसेनेने मोठं केलं त्या पक्षाशी त्यांनी गद्दारी केली आहे माझ्या पराभवासाठी देखील त्यांची गद्दारीच जबाबदार होती मी माझा पराभव मान्य केलाय मात्र माझे डिपॉझिट जप्त झाले नव्हते ही त्यांनी माहिती घ्यावी ज्या ठाकरेंनी त्यांना मोठं केलं त्या उद्धव साहेबांचं नाव घेताना यांची जीभ जड होते त्यांना सत्तेची मस्ती आलेली दिसते आणि म्हणूनच आम्ही ती मस्ती काढण्यासाठी निवडणूक लागण्याची वाटच बघतोय निवडणूक लागू द्या मग बघा पाटणची जनता देसाईंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही 
पाटण तालुक्यात अवैध उत्खनन सुरू आहे त्याकडे मंत्री देसाई यांचे जाणून बुजून दुर्लक्ष आहेत भविष्यात अतिवृष्टी झाली तर  तालुक्याला धोका आहे याचे मंत्र्यांना काही देणेघेणे नाहीये म्हणून आम्ही या प्रश्नी आंदोलन उभे करणार आहोत असा इशारा देखील कदम यांनी यावेळी दिला

No comments:

Post a Comment