वेध माझा ऑनलाईन - आज मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कवर होणाऱ्या या मेळाव्यासाठी मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र मेळाव्यापूर्वी शिवाजी पार्क परिसरात आणि शिवसेना भवनासमोर मनसेकडून लावण्यात आलेले पोस्टर सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत. या पोस्टरवर जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री म्हणून राज ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या पोस्टरवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर लावलेल्या त्या पोस्टरवर प्रतिक्रिया दिली आहे. देशात लोकशाही आहे. कोणी ही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्यांच्याकडे बहुमत असेल तर होऊ शकतात. बहुमत हे चंचल असतं. आज आमच्याकडे असेल उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारला देखील जोरदार टोला लगावला आहे. महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख कोला जातो. त्या गुढीवर केंद्र सरकारने मोगलाईन पद्धतीनं आक्रमक केले आहे. त्यामुळे राज्यातील जनता दुःखी आहे. पण जनतेचा संकल्प आहे, नव्या वर्षात ही गुढी घराघरात उभारल्या शिवाय राहणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment